ओडिशात लवकरच नवीन उत्पादन शुल्क धोरण   

भुवनेश्वर : ओडिशा सरकारचे नवीन उत्पादन शुल्क धोरण २० जूनपर्यंत जाहीर केले जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी शुक्रवारी सांगितले. या धोरणाची अंमलबजावणी आम्ही  एका विशिष्ट पद्धतीने करणार आहोत. विविध राज्यांच्या उत्पादन शुल्क धोरणांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही अनेक पथके तयार केली आहेत. या पथकांनी विविध राज्यांना भेटी देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नवीन धोरण तयार करण्यास वेळ लागत असल्याचे हरिचंदन यांनी सांगितले. 

Related Articles